Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

अथांग

संथ मनाचा थांग कळेना कधी शुन्यात अथांग जग ते कधी अनंत विश्वात अपि तू बसे कड्यावर रमे एकटे कधी वाटते बरसावे नभ कधी आवडे निरव दुर्लभ क्षणांच्या आठवात कधी ते मुरत रहाणे .. प्रगल्भ होणे उरे अंतरी सल एखादी कंप पावते स्थिर समाधी प्रवाही मग तियेच्या कधी ते वहात रहाणे .. चिंब होणे संथ मनाला अशांत समयी दिस सरताना संध्याछायी क्षितिजीच्या कुटीत कधी त्या सोडून येणे .. पुन्हा उमलणे     ©️विजयकुमार पानसरे