Skip to main content

Posts

Showing posts from July, 2019

तू आणि मी

तुझीच तू... माझाच मी... हे उमगले ना मला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला जग पूर्ण दिसे फिके धुके परी तूच चोहीकडे मन गिरक्या घेऊनि बंदिश लेऊनी  निरागस बागडे!! क्षण एक तुला आठवुनिया हा जीव वेडावला तुझीच तू... माझाच मी... हे उमगले ना मला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला तव आठवाने फुले धरा मन चिंब भिजून जाई मन पवित्र प्रसन्न मोहक वाटे शुभ्र आकाश निळाई पक्षांची किलबिल जणू सूरताल धरी वनराई जणू चित्ती कोणी कवी रचितसे कोमल श्यामला... तुझीच तू... माझाच मी... हे उम ग ले ना मला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला *** तुझीच मी... माझाच तू... सुचवू कसे मी तुला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला छाया तुझी विश्रांत ही सहवास तुझा हवाहवा तव आभासेही श्रावण ये ग्रीष्मात फुले गारवा संगे तुझ्या उभी असे तव हात हाती दिला प्रेमळ तूही प्रतिसाद दे स्वीकारूनिया म ज ला, जणू निश्चल सागर कवेत घेई सरिता चंचला तुझीच मी... माझाच तू... कळले तुला अन् मला, मन उंच नभी घेऊनिया, चल कल्पनेचा झुला ©️विजयकुमार पानसरे

एकादशी

जन्मदाता पिता, वात्सल्यसिंधु आई तेथ माझी पंढरी, तीच माझी विठाई करुनी सकल सायास, मज नेले या पदास होईन मी उतराई,पुण्य तेची ठायी काशी वाराणसी,तीर्थयात्रा कैसी हेची चारधाम,पुण्य एकादशी तयांसी शत नमन,तेची गुरुस्थान तोचि असे कैलास,तेची असे मान !! आणिक काय केल्या, मिळे पुण्यराशी संक्षेपी सांगू ठसे,मनोमनी ज्ञानोबा नामा चोखा, एकनाथ गोरा तुका यांसी तिन्ही लोक, भेटू आले... प्राणिमात्र चराचर,हेची देवाचे अवतार तयांसी सेवा निरंतर,हेची सांगितले... त्याने निर्मिली संसारे,पुष्पे वेली जनावरे स्वतःसाठी काही,नच मागितले. पीडितांसी सेवावे, जनी विश्वरूप पहावे, सुखी करुनी सोडावे, सकल जन!! ©️विजयकुमार पानसरे

परीक्षा

अभ्यास जरा जास्त आहे, दर पेपर ला वाटतं, सगळं वाचुन न झाल्याचं, शल्य मनात दाटतं, पेपर मधला एकही प्रश्न, ओळखीचा वाटत नाही, मनात भीतीशिवाय तेव्हा कोणीच बोलत नाही, तितक्यात कोप...