प्रगट सामोरी उभी कधी तू कधी स्वप्नातली सखी तू आभास कधी तुझा सुखाचा कधी कविता लता कधी तू शांत तजेली उषा कधी तू कधी हुरहूरणारी संध्या तू निर्मळ शीतल छाया कधी तू जगावेगळी माया तू तू रेशमाचा बंध हवासा गुंफणारी माला कधी तू कधी झुळूक तू वाऱ्याची दरवळणारा सुगंधही तू दवबिंदू तू पर्णा वरचा सूक्ष्म त्यातली सृष्टी तू मधुर सुधारस तू फुलांचा त्यावर मोहक पाखरु तू भास मनीचा श्वास जीवाचा सहवास हवासा फक्त तू आणि तू!! ©विजयकुमार पानसरे