Skip to main content

मोबाईल आणि सीम

आपण आपल्या आजूबाजूला बरीच माणसं पहातो. बरेच स्वभाव पहातो. एकाच परीस्थितीत वेगवेगळ्या व्यक्तींकडून वेगवेगळे प्रतीसाद अनुभवतो. व्यक्ती तितक्या प्रकृती...वगैरे. राशी म्हणतात माणूस जातीवर नाही राशीवर जातो. कोणत्या राशीत जन्मावे, कोणत्या घरात जन्मावे हे कोणीही स्वत: ठरवू शकत नाही.

मनुष्यप्राणी एक कोडं आहे. कल्पना करा की मानवी देह मोबाईल असला तर...आत्मा हे सीमकार्ड आहे. प्रत्येक जन्मात मोबाईल बदलतो पण सीमकार्ड तेच राहातं ... अगदी एखाद् वर्षाची मूलं देखील जेव्हा काही वेळी प्रौढासारखं sensibly वागतात, आपल्याला कौतुक वाटतं... मोबाईल नवा आहे पण सीमकार्ड जूनंच आहे...
आपण शाळेत एकेक इयत्ता शिकत पुढे जातो ... मनुष्याचा आत्माही प्रत्येक जन्मात एकेक इयत्ता पास होत जातो. जे काही चांगलं वाईट शिदोरीत घेतो, तेच संस्कार पुढील जन्मी दिसतात. म्हणून आत्मोन्नत होणं महत्वाचं. नैनं छिंदंती शस्त्राणी... Energy can neither be created nor be destroyed...

या आत्मारुपी energy ला कोणता form द्यायचा ते आपल्या हातात आहे.
So its better to get your sim card updated with good thoughts while getting new mobile.

©️विजयकुमार पानसरे  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आशा

शोभावे दिस पुन्हा, ऊन सावल्यांनी भिजावे मन पुन्हा, चिंब चांदण्यानी सरावी उदासी, ल्यावा चैतन्याचा नूर मातीमोल सारा स्वार्थ, यावा मायेला बहर ओसरावा सर्व काठ, पुन्हा जीवन फुलावे देव घेऊन मस्तकी, लोका आनंदे डुलावे निवळाव्या साऱ्या चिंता, सुख पुरून उरावे लाख पाखरांचे थवे, उंच आकाशी उडावे दूर वाटेतले खोडे, व्हावे जीवन प्रवाही सुटतील सारी कोडी, जरी उरलीत काही व्हावे मळभही दूर, लख्ख उजेड आकाशी  गीत गाईन नव्याने, गाठ बांधुनी मनाशी ©️विजयकुमार पानसरे

परीक्षा

अभ्यास जरा जास्त आहे, दर पेपर ला वाटतं, सगळं वाचुन न झाल्याचं, शल्य मनात दाटतं, पेपर मधला एकही प्रश्न, ओळखीचा वाटत नाही, मनात भीतीशिवाय तेव्हा कोणीच बोलत नाही, तितक्यात कोप...

तू आणि मी

तुझीच तू... माझाच मी... हे उमगले ना मला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला जग पूर्ण दिसे फिके धुके परी तूच चोहीकडे मन गिरक्या घेऊनि बंदिश लेऊनी  निरागस बागडे!! क्षण एक तुला आठवुनिया हा जीव वेडावला तुझीच तू... माझाच मी... हे उमगले ना मला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला तव आठवाने फुले धरा मन चिंब भिजून जाई मन पवित्र प्रसन्न मोहक वाटे शुभ्र आकाश निळाई पक्षांची किलबिल जणू सूरताल धरी वनराई जणू चित्ती कोणी कवी रचितसे कोमल श्यामला... तुझीच तू... माझाच मी... हे उम ग ले ना मला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला *** तुझीच मी... माझाच तू... सुचवू कसे मी तुला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला छाया तुझी विश्रांत ही सहवास तुझा हवाहवा तव आभासेही श्रावण ये ग्रीष्मात फुले गारवा संगे तुझ्या उभी असे तव हात हाती दिला प्रेमळ तूही प्रतिसाद दे स्वीकारूनिया म ज ला, जणू निश्चल सागर कवेत घेई सरिता चंचला तुझीच मी... माझाच तू... कळले तुला अन् मला, मन उंच नभी घेऊनिया, चल कल्पनेचा झुला ©️विजयकुमार पानसरे