वृथाचा अभिमान सारा
वृथाच्या या वल्गना
वृथाचे हे विश्वही
अन् भाववेड्या कल्पना ।
वृथाचे ते क्षणिक मित्र
वृथाच्या त्या मैत्रिणी
वृथाचे सारे बहाणे
अन् संधीसाधू स्वार्थही ।
मिथ्या आहे हास्य सारे
अन् उगाचंच चौकश्या
वृथा ची आत्मीयता
अन् मिथ्य या दाही दिशा ।
नको झाले सर्वकाही
नको रमणे साऱ्यात या
नकोच ते कोणास कोणी
विश्वाच्या पसाऱ्यात या ।
म्हणे कोणी निराशावादी
खुशाल म्हणावे तयाने
कधी चाला मजठायी
अट ही... माझ्या बुटाने।
कळेल कधी का न कळे
माणसाची प्रत माणसाला
कोण माणूस शोधताना
जन्म आला जन्म गेला।
©️विजयकुमार पानसरे
वृथाच्या या वल्गना
वृथाचे हे विश्वही
अन् भाववेड्या कल्पना ।
वृथाचे ते क्षणिक मित्र
वृथाच्या त्या मैत्रिणी
वृथाचे सारे बहाणे
अन् संधीसाधू स्वार्थही ।
मिथ्या आहे हास्य सारे
अन् उगाचंच चौकश्या
वृथा ची आत्मीयता
अन् मिथ्य या दाही दिशा ।
नको झाले सर्वकाही
नको रमणे साऱ्यात या
नकोच ते कोणास कोणी
विश्वाच्या पसाऱ्यात या ।
म्हणे कोणी निराशावादी
खुशाल म्हणावे तयाने
कधी चाला मजठायी
अट ही... माझ्या बुटाने।
कळेल कधी का न कळे
माणसाची प्रत माणसाला
कोण माणूस शोधताना
जन्म आला जन्म गेला।
©️विजयकुमार पानसरे
Comments
Post a Comment