Skip to main content

समशेर

अंधार दूर सरला,लक्ख पहाट झाली
सजली धरा मराठी,बुट्टीलुगडे ल्याली

ओलांडुनिया सारे,ग्रहताऱ्यांचे पसारे
धाडले श्रीहरीने, किल्ले शिवनेरी

निद्रा बहु दिनीची,आज असे सरली
पुत्र जन्मला गडी, जिजाऊ आई झाली

मातेच्या कडेवरूनी, मिरवीतसे खुशाल
बुरुज जुन्नर पेठ, सदर नी महाल

गोंडस म्हणे कोणी, कधी राजबिंडे
राजांचे प्रतिबिंब जणू, म्हणती कोणी लाडे

देवकथा ऐकोन,वर्षे सरली थोडी
शिक्षण सुरू जाहले, वाटे अवीट गोडी

भाषा विद्या कला,संतांची शिकवण
राज्यभ्यास कधी तो,कधी हरिकीर्तन

युद्ध तालीम रोजची, नेमे जोर बैठका
तलवार ढाल अभ्यास, भाला दांडपट्टा

दिवसागणिक मनीची, प्रतिमा स्पष्ट झाली
निराश चर्चा कानी, नसे कुणीच वाली

दिपावली तरीही, अंधार दाटलेला
माणुसकीवर घाला, गनिमाने घातलेला

कोवळ्या वयास माझ्या, एक जाणीव झाली
प्रत्युत्तरात हवी ती, रणधुरंधर खेळी

दुष्टसंहारे सह्याद्री, संग्रामी सरसावला
आबा दुरांतरावर, खेळवीत त्या शहाला

पुरे झाला छळ तो, लोपलीसे प्रतीक्षा
हे राज्य व्हावे हि तो, श्रींची इच्छा

सोबतीला सखे, अन् शुभाषिश सारे
प्रतिज्ञेस साक्षी, गड सूर्य चंद्र तारे

रायरेश्वरास साक्षी, रुधिराभिषेक झाला
बारा मावळ गर्जले, हर हर महादेव बोला

शुभारंभ कोठे, विचार पक्का झाला
कार्य सिद्धीस गेले, तोरणा सर केला

रयतेस अभय देण्या, उसळली समशेर
यज्ञास आरंभ झाला, आहुत्याही चीरथोर

मार्ग अन् उद्देश, असे जयाचा नीट
विश्वाचा नियंता, पुरवीत सर्व हट्ट

स्वराज्य स्थापन कारणे, शिवधनुष्य उचलला
वंदूनी शिवशंभू, श्रीगणेशा हा केला

छत्रपती शिवाजी महाराजसाहेब शहाजीराजे भोसले यांसी सादर प्रणाम!

©️विजयकुमार पानसरे

Comments

Popular posts from this blog

आशा

शोभावे दिस पुन्हा, ऊन सावल्यांनी भिजावे मन पुन्हा, चिंब चांदण्यानी सरावी उदासी, ल्यावा चैतन्याचा नूर मातीमोल सारा स्वार्थ, यावा मायेला बहर ओसरावा सर्व काठ, पुन्हा जीवन फुलावे देव घेऊन मस्तकी, लोका आनंदे डुलावे निवळाव्या साऱ्या चिंता, सुख पुरून उरावे लाख पाखरांचे थवे, उंच आकाशी उडावे दूर वाटेतले खोडे, व्हावे जीवन प्रवाही सुटतील सारी कोडी, जरी उरलीत काही व्हावे मळभही दूर, लख्ख उजेड आकाशी  गीत गाईन नव्याने, गाठ बांधुनी मनाशी ©️विजयकुमार पानसरे

परीक्षा

अभ्यास जरा जास्त आहे, दर पेपर ला वाटतं, सगळं वाचुन न झाल्याचं, शल्य मनात दाटतं, पेपर मधला एकही प्रश्न, ओळखीचा वाटत नाही, मनात भीतीशिवाय तेव्हा कोणीच बोलत नाही, तितक्यात कोप...

तू आणि मी

तुझीच तू... माझाच मी... हे उमगले ना मला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला जग पूर्ण दिसे फिके धुके परी तूच चोहीकडे मन गिरक्या घेऊनि बंदिश लेऊनी  निरागस बागडे!! क्षण एक तुला आठवुनिया हा जीव वेडावला तुझीच तू... माझाच मी... हे उमगले ना मला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला तव आठवाने फुले धरा मन चिंब भिजून जाई मन पवित्र प्रसन्न मोहक वाटे शुभ्र आकाश निळाई पक्षांची किलबिल जणू सूरताल धरी वनराई जणू चित्ती कोणी कवी रचितसे कोमल श्यामला... तुझीच तू... माझाच मी... हे उम ग ले ना मला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला *** तुझीच मी... माझाच तू... सुचवू कसे मी तुला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला छाया तुझी विश्रांत ही सहवास तुझा हवाहवा तव आभासेही श्रावण ये ग्रीष्मात फुले गारवा संगे तुझ्या उभी असे तव हात हाती दिला प्रेमळ तूही प्रतिसाद दे स्वीकारूनिया म ज ला, जणू निश्चल सागर कवेत घेई सरिता चंचला तुझीच मी... माझाच तू... कळले तुला अन् मला, मन उंच नभी घेऊनिया, चल कल्पनेचा झुला ©️विजयकुमार पानसरे