तुझीच तू...
माझाच मी...
हे उमगले ना मला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला
जग पूर्ण दिसे फिके धुके
परी तूच चोहीकडे
मन गिरक्या घेऊनि बंदिश लेऊनी
निरागस बागडे!!
क्षण एक तुला आठवुनिया
हा जीव वेडावला
तुझीच तू...
माझाच मी...
हे उमगले ना मला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला
तव आठवाने फुले धरा
मन चिंब भिजून जाई
मन पवित्र प्रसन्न मोहक वाटे
शुभ्र आकाश निळाई
पक्षांची किलबिल जणू
सूरताल धरी वनराई
जणू चित्ती कोणी कवी रचितसे
कोमल श्यामला...
तुझीच तू...
माझाच मी...
हे उमगले ना मला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला
***
तुझीच मी...
माझाच तू...
सुचवू कसे मी तुला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला
छाया तुझी विश्रांत ही
सहवास तुझा हवाहवा
तव आभासेही श्रावण ये
ग्रीष्मात फुले गारवा
संगे तुझ्या उभी असे
तव हात हाती दिला
प्रेमळ तूही प्रतिसाद दे
स्वीकारूनिया मजला,
जणू निश्चल सागर कवेत घेई सरिता चंचला
तुझीच मी...
माझाच तू...
कळले तुला अन् मला, मन उंच नभी घेऊनिया, चल कल्पनेचा झुला
©️विजयकुमार पानसरे
Bhari bhari lihila ahes... Full romantic
ReplyDeleteDhanyawad sir !!
Delete