Skip to main content

प्रित

रम्य होती ती पहाट, कोवळे दव शिंपले
सूर होते शांततेचे, नभ गुलाली लिंपले

प्रित होती आसमंती, अंतरी मन दाटले  
चाहूल ती होती कुणाची, काय होते योजले

शोधती आतुर डोळे, स्पंदनी आभास जो
तर्क सारे खुंटले, अंतरी विश्वास तो

कोण गीत सुचले असे, मन मनाशी गात होते
चित्र भोवतीचे गुलाबी वेगळ्या तालात होते  

प्रीत माझ्या कल्पनेची, रेखिली पटलावरी
मम कथेची नायिका, उतरेल का धरणीवरी

ध्येयवेड्या त्या पहाटे, ध्यास मजला लागला 
सप्तसुर होतेच कळले, आठवा मज साधला

©️विजयकुमार पानसरे

Comments

Popular posts from this blog

आशा

शोभावे दिस पुन्हा, ऊन सावल्यांनी भिजावे मन पुन्हा, चिंब चांदण्यानी सरावी उदासी, ल्यावा चैतन्याचा नूर मातीमोल सारा स्वार्थ, यावा मायेला बहर ओसरावा सर्व काठ, पुन्हा जीवन फुलावे देव घेऊन मस्तकी, लोका आनंदे डुलावे निवळाव्या साऱ्या चिंता, सुख पुरून उरावे लाख पाखरांचे थवे, उंच आकाशी उडावे दूर वाटेतले खोडे, व्हावे जीवन प्रवाही सुटतील सारी कोडी, जरी उरलीत काही व्हावे मळभही दूर, लख्ख उजेड आकाशी  गीत गाईन नव्याने, गाठ बांधुनी मनाशी ©️विजयकुमार पानसरे

परीक्षा

अभ्यास जरा जास्त आहे, दर पेपर ला वाटतं, सगळं वाचुन न झाल्याचं, शल्य मनात दाटतं, पेपर मधला एकही प्रश्न, ओळखीचा वाटत नाही, मनात भीतीशिवाय तेव्हा कोणीच बोलत नाही, तितक्यात कोप...

तू आणि मी

तुझीच तू... माझाच मी... हे उमगले ना मला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला जग पूर्ण दिसे फिके धुके परी तूच चोहीकडे मन गिरक्या घेऊनि बंदिश लेऊनी  निरागस बागडे!! क्षण एक तुला आठवुनिया हा जीव वेडावला तुझीच तू... माझाच मी... हे उमगले ना मला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला तव आठवाने फुले धरा मन चिंब भिजून जाई मन पवित्र प्रसन्न मोहक वाटे शुभ्र आकाश निळाई पक्षांची किलबिल जणू सूरताल धरी वनराई जणू चित्ती कोणी कवी रचितसे कोमल श्यामला... तुझीच तू... माझाच मी... हे उम ग ले ना मला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला *** तुझीच मी... माझाच तू... सुचवू कसे मी तुला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला छाया तुझी विश्रांत ही सहवास तुझा हवाहवा तव आभासेही श्रावण ये ग्रीष्मात फुले गारवा संगे तुझ्या उभी असे तव हात हाती दिला प्रेमळ तूही प्रतिसाद दे स्वीकारूनिया म ज ला, जणू निश्चल सागर कवेत घेई सरिता चंचला तुझीच मी... माझाच तू... कळले तुला अन् मला, मन उंच नभी घेऊनिया, चल कल्पनेचा झुला ©️विजयकुमार पानसरे