एक गंमत सांगतो,
सिंगापूर ला असताना बरेच जण सोबत मराठी होते. त्यामुळे एकमेकात मराठीच जास्त करून वापरत असू. पण आपल्याला बरेच इंग्रजी शब्द घुसवून बोलायची घाणेरडी सवय असते. त्यामुळे त्या चीनी, तामिळ, मलय लोकांना अंदाज यायचा की आम्ही काय बोलतोय. सावरकर आठवले🙏🏻, प्रत्येक शब्द मराठीत सुरू झाला. म्हणजे उदाहरण म्हणून...
project साठी प्रकल्प
Manhours साठी मनुष्यतास
Director साठी संचालक
Company साठी संस्था
Deputation साठी प्रतिनियुक्ती वगैरे.
एकूण एक शब्द मराठी बोलायचो. खूप मजा यायची आणि मातृभाषेचे महत्व जाणवायचे आणि अभिमान ही वाटायचा. तिथे असलेले तामिळ लोक स्वतःच्या भाषेतच एकमेकांशी बोलायचे, त्यांची भाषेविषयीची कट्टरता इतकी का होती तेही उमगायला लागले. मग अशी परिस्थिती तयार झाली की आम्ही काय बोलतोय, एकही शब्द इतरांना कळेना. तिकडेही भाषानिहाय गट होतेच. आपलाही एक गट तयार झाला.
महाराष्ट्रात असताना मातृभाषेचे महत्व काय.. हे मनात असले तरीही जाणवत नाही. पण तीच आपली ओळख असते, अस्तित्व असते.
©️विजयकुमार पानसरे
1000000% khara ahe
ReplyDeleteAagadi barobar... aamhi hi ha anubhav qatar la ghetala hota.. tujhya ya lekh ne junya aathavani punha dolya samore aalya.. dhanyawad tula
ReplyDelete